नांदेड (प्रतिनिधी)- विमानतळ पोलिसांनी पुन्हा एकदा एका कॉफी शॉपवर छापा टाकून असभ्य वर्तन करणाऱ्या सहा जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे खटला दाखल केला आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनिरूद्ध काकडे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ देवके, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, दारासिंग राठोड,दत्तात्रय गंगावारे आणि महिला पोलीस अंमलदार प्रिया शिंदे यांनी युवा कॅफे शॉप राज मॉल नांदेड येथे तपासणी केली. त्या सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कॅफे चालक परमज्योतसिंघ पप्पूसिंघ दिघवा (18), ग्राहक अक्षय सोनबाराव आरणे (20) रा. नारायणनगर नांदेड, सचिन विठ्ठल मजरे (27) रा. बारूळ ता. कंधार, अनिकेत सोनबाराव आरणे (21) रा. नारायणनगर नांदेड, निलेश परमेश्वर इंगळे (18) रा. शिवनगर नांदेड, अक्षय हरबा शिंदे (26) रा. चैतन्यनगर नांदेड या सर्वांविरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार खटला दाखल करण्यात आला आहे.
विमानतळ पोलिसांनी दुसऱ्यांदा कॉफी शॉपमधील असभ्य वर्तनावर कार्यवाही केली