नांदेड (प्रतिनिधी)- 21 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जारी केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्याच्या यादीत फक्त एकच नाव आहे. इतर अधिकाऱ्यांमध्ये 13 सहायक पोलीस निरीक्षक आणि 7 पोलीस उपनिरीक्षकांचे खांदेपालट झाले आहे.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी काल 21 ऑगस्ट रोजी 13 सहायक पोलीस निरीक्षक आणि 7 पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. रात्री उशीरा एका पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. त्यात नायगाव येथील रामा सदाशिव पडवळ यांना नियंत्रण कक्षात बोलाविण्यात आले आहे आणि नियंत्रण कक्षात नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक अभिषेक लक्ष्मण शिंदे यांना नायगाव येथे पाठविण्यात आले आहे. 30 ऑगस्टपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अद्याप काही नवीन पोलीस निरीक्षक नांदेड जिल्ह्यात हजर होणे बाकी आहे. त्यामुळे बहुदा काल एकच आदेश काढण्यात आला असेल, त्यामुळे इतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश 30 ऑगस्टपर्यंत निघतील अशी अपेक्षा आहे.
नायगावचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे