नांदेड(प्रतिनिधी)-वडीलोपार्जित जमीनीचे वाटप आणि यातून वाद काकाचा खून झालेल्या प्रकरणात मारेकरी पुतण्या आणि त्याचा एक मुलगा अशा दोघांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.पी.शिंदे यांनी 26 ऑगस्टपर्यंत, 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. यातील एक हल्लेखोर जखमी असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दि.22 ऑगस्टच्या सकाळी 9.30 वाजेच्यासुमारास तुप्पा पाटी जवळ साहेबराव पांडूरंग कदम (55) वर्ष रा.तुप्पा यांना त्यांचे काका तातेराव पांडूरंग कदम(50), तातेरावचे दोन पुत्र, बालाजी(22) आणि ऋषीकेश (20) या तिघांनी साहेबरावला गाठले आणि वडिलोपार्जित जमीनीचा वाद रस्त्यावर काढला.घटना झाली तेंव्हा तातेराव आणि बालाजी यांनी साहेबरावला शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. पण ऋषीकेशने आपल्या जवळील चाकू साहेबराव पांडूरंग कदम यांच्या पोटात व छातीत वार करून त्यांचा खून केला अशी तक्रार साहेबराव कदमचे पुत्र तिरुपती कदम यांनी दिल्यावरून नांदेड ग्रामीण पोलीसांनी तातेराव पांडूरंग कदम आणि त्यांचे पुत्र बालाजी व ऋषीकेश या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 341, 323,504, 34 नुसार गुन्हा क्रमांक 596/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्याकडे आहे.
या प्रकरणात भांडणाच्यावेळी ऋषीकेश तातेराव कदम यालाही मार लागला त्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दि.23 ऑगस्ट रोजी संकेत दिघे यांनी अटकेतील तातेराव पांडूरंग कदम आणि बालाजी तातेराव कदम या दोघांना न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायाधीश एम.पी.शिंदे यांनी दोघांना तिन दिवस, 26 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पुतण्याला मारणाऱ्या काकाला आपल्या मुलासह पोलीस कोठडी