चोरीच्या विविध घटनांमध्ये 4 लाख 36 हजारांचा 614 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला पोलीस अंमलदारांचे घर फोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार 114 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बोंढार हवलेली जवळ तीन जणांनी दुचाकीवर जाणाऱ्या दुध विक्रेत्याला लुटले आहे. वजिराबादमधील महाविर चौकाजवळून एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 4 लाख 36 हजार 614 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
नालंदा बौध्द विहाराजवळ राहणाऱ्या महिला पोलीस अंमलदरार विश्रांती अविनाश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता त्यांनी आपल्या घराला कुलूप लावून पुणे येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता त्या परत आल्या. तेंव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडलेला होता. घरातील कपाटामध्ये ठेवलेले 50 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दाणिगे असा एकूण 3 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रोडेकर अधिक तपास करीत आहेत.
गजानन गोविंदराव तिडके हे दुध व्यवसायीक 21 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता आपले दुध विकून दुचाकी गाडीवर हैद्राबाद वळण रस्त्यावरून बोंढार हवेलीकडे जात असतांना त्यांच्या पाठीमागून 25 ते 30 वयोगटाचे युवक एका दुचाकीवर आले आणि त्यांनी गजानन तिडकेला गळ्याला चाकू लावून दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम 31 हजार 500 रुपये आणि 3 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 34 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. सेाबतच चोरट्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.7596 ही तेथेच सोडून झाडाझुडपांच्या मधून पळून गेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
शेख अजीज शेख जलील यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एम.2087 महाविर चौकातील हनुमान मंदिराजवळ 18 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास उभी केली होती. 22 ऑगस्ट 2021 च्या दुपारी 3 वाजेदरम्यान ती 15 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 15 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला पोलीस अंमलदाराचे घरफोडून 3 लाख 47 हजारांची चोरी