नांदेड(प्रतिनिधी)-कोणत्याही राजकीय पक्षांनी गुंडांना आश्रय देवू नये अशा शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना आपली भावना व्यक्त केली.
नांदेड येथे एका पत्रकार परिषदेत मुळ विषयानंतर विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर अशोक चव्हाण बोलत होते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हो अत्यंत गंभीर विषय आहे. नांदेड शहरात आणि जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना अनेक घडल्या. त्यात राजकीय पाठबळ असल्याशिवाय असे प्रकार घडत नाहीत असे अशोक चव्हाण म्हणाले. कोणी मटका किंग असेल, कोणी रेती माफिया असेल, कोणताही माफिया असेल आणि समाजात अशांतता पसरविणारा गुंड असेल त्याला कोणत्याही राजकीय पक्षांनी पाठबळ देवू नये असे अशोक चव्हाण म्हणाले. राजकीय पक्षांच्या आश्रयाशिवाय गुंडगिरी होवूच शकत नाही असे माझे मत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. माझ्या पक्षात असा कोणताही माफीया नसल्याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी जोरदारपणे केला. (पण यात किती सत्य आहे?) अशा घटनांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पोलीसांनी त्यांचे काम योग्यरितीने केले पाहिजे आणि आपली जबाबदारी पुणेपणे पार पाडली पाहिजे. जेणे करून गुंडगिरीचा त्रास सर्वसामान्य लोकांना होणार नाही आणि शांतता कायम राहिल.
नांदेड शहरातील खड्यांच्या प्रश्नांवर बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले नांदेडमध्येच नव्हे तर राज्यभरात बऱ्याच जागी खड्डे पडले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळेे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील पाच वर्षात त्या सरकारने पाडलेले हे खड्डे आम्ही बुजवत आहोत. सोबतच आम्ही आमची विचारश्रेणी उद्याच्या कार्यक्रमात मांडणार आहोत ही येणाऱ्या निवडणुकांची तयारी सुध्दा आहेच. देगलूरमध्ये निवडणुकीची तयारी अत्यंत भक्कमपणे तयार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार होता आणि त्यांचे निधन झाल्यानंतर त्याच पक्षाच्यावतीने त्या ठिकाणच्यावतीने निवडणुक लढविण्यात यावी असा करार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. या निवडणुकीत आमदार अमरनाथ राजूरकर यांच्याकडे अधिभार असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी राजांचे स्मारक न्यायालयाच्या स्थगितीमुळे बंद आहे. त्यात आम्ही सरकारच्यावतीने जोरदार उत्तर देण्याची तयारी करत आहोत असे सांगितले. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आम्ही जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
युवराज संभाजी राजे यांनी नांदेडमध्ये रान पेटवून देईल असे वक्तव्य केले होते त्याबद्दल मला कांही सांगायचे नाही असे बोलतांना अशोक चव्हाण यांनी राजांच्या कार्यक्रमात भाजप प्रणित गर्दी होती असे सांगितले. ही गर्दी कोणी आणली, कोणी गाड्या बोलवल्या याची सर्व माहिती माझ्याकडे असल्याचे सांगितले. 50 टक्के मर्यादेत आरक्षणाचा देतांना केंद्र शासनाने फक्त 50 टक्केची मर्यादा संपवून तो अधिकार राज्यांना दिला नाही याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला.ज्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत बोलायचे असते ते गल्ली बोलतात त्यांनी दिल्लीत बोलायला हवे अशा शब्दात केंद्र शासनाच्या निर्णयाचा उल्लेख केला. मराठा आरक्षण मिळावे ही कॉंग्रेस पक्षाची आणि माझी भुमिका आहेच आता ते काम आव्हानात्मक झाले आहे असा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला. 5 मिनिटात लोकसभेत आणि राज्यसभेत अध्यादेश काढून आजही ही परिस्थिती बदलता येते पण ते केंद्र शासनाच्या हातात आहे असे सांगितले. अशोक चव्हाण म्हणाले मी मराठा आरक्षणाबद्दल संपुर्ण इमानदारीने काम करतो आहे. इतर कोणत्या बद्दल काय बोलतात त्यासाठी मला कांही देणे-घेणे नाही असे सांगितले.
राजकीय पक्षांच्या आश्रयाशिवाय गुंडगिरी शक्यच नाही-अशोक चव्हाण