पत्रकारापेक्षा वेश्या श्रेष्ठ म्हणणाऱ्या सआदत हसन मंटोला सलाम

भोकर फाट्यात बोरुबहाद्दराने घेतलेल्या रंगीत पाण्याची नशा उतरली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-24 ऑगस्टच्या भोकर फाटा येथील रंगीत पाण्याची तंद्री न उतरणाऱ्या बोरु बहाद्दराने पुन्हा एकदा सुर्याजी पिसाळच्या गुप्त पत्राचा उल्लेख करून पुन्हा माझीच लाल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठीच सआदत हसन मंटोने भारताच्या स्वातंत्र्यापुर्वीच पत्रकारांची वेश्येसोबत तुलना करत वेश्येलाच ती मोठी असते असे म्हटले होते. आज मंटोच्या मृत्यूला 66 वर्ष झाली आहेत. तरी त्यांचे म्हणणे आजही योग्यच आहे असे म्हणावे लागेल.
एका बोरु बहाद्दराने 24 ऑगस्ट रोजी सुर्याजी पिसाळच्या हद्दीत असलेल्या एका ढाब्यावर रंगीत पाण्याचा आनंद घेतांना अनेक “सुणीये’ सुध्दा तेथे हजर होते. रंगीत पाण्याचा आनंद घेता-घेता सुर्याजी पिसाळने दिलेल्या कोणत्या तरी अर्जाचा उल्लेख करत आपले वृत्त प्रसिध्द केले. त्या वृत्तात कागदपत्रे वायरल करत आहेत असे शब्द लिहिलेले आहेत. सुर्याजी पिसाळने दिलेले पत्र गुप्त नाही काय? मग ते या बोरु बहाद्दराला कसे प्राप्त झाले याचाही शोध पोलीस महासंचालकांनी घ्यावा आणि त्यावर योग्य कार्यवाही व्हावी. असे बोलले जात आहे. म्हणूच 11 मे 1912 रोजी जन्मलेल्या सआदत हसन मंटो या पत्रकारांनी आपल्या जीवनात लिहुन ठेवले आहे की, “कोठे की एक तवायफ और एक बिका हुआ पत्रकार, एकही श्रेणी में आते है।, लेकीन इनमें तवायफ की इज्जत ज्यादा होती है..।’ सआदत हसन मंटो यांनी आपल्या जीवनात आपल्या लिखाणासाठी खुप त्रास भोगले आहेत. 18 जानेवारी 1955 रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या निधनाला 66 वर्ष पुर्ण झाली आहेत. पण त्यांनी लिहिलेले पत्रकारांसाठीचे वाक्य सत्यच आहे. एका रंगीत पाण्याच्या बाटलीसाठी आपल्या घरापासून 20 किलो मिटर जाऊन पिलेल्या रंगीत पाण्याची तंद्री आजही उतरलेली नाही.
कोणी पोलीस अधिक्षक कार्यालयातून पत्र मिळवतो हा प्रश्न या बोरु बहाद्दराचा नाही. सुर्याजी पिसाळने निर्गमित केलेल्या ज्या पत्राची चर्चा हा बोरु बहाद्दर करतो ते पत्र किती जागी गेले, किती लोकांनी पाहिले आणि त्याची चर्चा झाली.ही माहिती करून घेण्यासाठी या बोरु बहाद्दराला आपली हाडे झिजवावी लागतील. राज्याच्या राजांनी सुध्दा या घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या पत्राविषयी बोंब उठविण्याचा प्रयत्न होत त्या पत्रातील सत्यता ही आरोपींना मदत करण्याची आहे. हे न जाणून घेता फक्त रंगीत पाण्यासाठी पत्रकाराता करणाऱ्या या बोरु बहाद्दराने ज्या स्वागत कक्षाच्या संदर्भाने बातमी लिहिली त्या स्वागत कक्षा जवळ उभे राहुन घेतलेल्या दोन रंगीत बाटल्या विसरला काय?
स्वागत कक्षामध्ये माझ्यामुळे तपासणी सुरू झाली असा कांगावा करणारा बोरु बहाद्दर आणि त्याचे अनेक सहकारी पत्रकार परिषदांमध्ये आम्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात येवू दिले नाही याची ओरड करतात. पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेडलाच राहणार आहे. कांही भुरट्या चोरांच्या नादी लागून रंगीत पाण्याची तंद्री आपल्यात उतरविणाऱ्या या बोरु बहाद्दराने त्या भुरट्या चोराने किती लोकांना गंडवले, किती लोकांची घरे उदवस्त केली याची माहिती घ्यायला हवी . नाही तर कधी तरी या बोरु बहाद्दराला सुध्दा तो खंडणीखोर अडचणीत आणेल. स्वागत कक्षात होणाऱ्या तपासणी अगोदर पोलीस अधिक्षक कार्यालयातील मुख्यद्वारावर सुध्दा नाव नोंदणी होते, कोणत्या कार्यालयात जायचे आहे हे लिहुन घेतले जाते, येणाऱ्याचा मोबाईल नंबर लिहुन घेतला जातो. गुपचुप उभे राहुन ज्या चोरट्याने स्वागत कक्षाचा फोटो काढला त्याची तरी नोंद होती काय?. सुर्याजी पिसाळने सुध्दा फटीचर बोरु बहाद्दरांच्या नादी लागण्यापेक्षा आपली श्रध्दा राजावर ठेवायला हवी. आपण चुक करू नये म्हणजे पत्रकारांना काही मिळणार नाही हे समजून घ्यावे.
पोलीस दलात सुरु असलेल्या एका लाखो रुपयांच्या घोटाळ्याची माहिती आम्हाला 15 दिवसापासून आहे. तरी आम्ही ते वृत्त प्रकाशीत केले नाही. आम्ही ते वृत्त नावासह प्रकाशीत करण्याचा दम ठेवतो. असा दम तयार करण्यासाठी आपली हाडे झिजवली तर या बोरुबहाद्दराचे भले होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *