महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालय आकुर्डी पुणे येथे मोफत ऑनलाईन सराव चाचण्यांची मालिका

नांदेड(प्रतिनिधी)-आभियांत्रीकी शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी डॉ.डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांनी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव चाचण्यांची मालिका घेणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी या सराव चाचणी मालिकेत सहभाग घ्यावा. यातील प्रवेश मोफत आहे. यामध्ये विजेत्यांना रोख 10 हजार रुपयांचे बक्षीस पण दिले जाणार आहे.
आगामी काळात अभियांत्रीकी प्रवेशासाठी सीईटी परिक्षा होणार आहेत. या अनुषंगाने पुणे येथील डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी येथे महाविद्यालय, पुणे व बेंटले एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एमएचटीसीईटी सराव चाचण्यांची मालिका घेतली जाणार आहे. या सराव चाचण्यांच्या मालिकेत मोफत प्रवेश आहे.
सराव परिक्षकांच्या समनवयक प्रा.सुभाशिनी रामटेके ह्या आहेत. सराव परिक्षांचे आयोजन करण्यात प्रथम वर्ष विभागाचे अधिष्ठाता डॉ.संजय बाबर, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ.अशोक मोरे, प्राचार्य डॉ.विजय वढाई यांच्या निरिक्षणात या चाचण्या होणार आहेत. संचालक डॉ.निरज व्यवहारे व संकुलाचे अध्यक्ष ना.सतेज पाटील यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. एमएचटीसीईटी सराव चाचणीत आपला सहभाग नोंदवून घेण्यासाठी गुगल सर्चमध्ये ब्राऊझर या ठिकाणी bit.ly/DYPCOE-CET टाईप करावे. अंतिम सराव चाचणी 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात येईल. 12वी असणाऱ्या आणि अभियांत्रिकी शिक्षणात रस अणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोफत संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ.डी.वाय.पाटील शिक्षण संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे. या सराव चाचण्यांमधील विजेत्यांना 10 हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *