नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कार्यकाळात लातूरच्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान तसेच जलसिंचन व्यवस्थापनात वैशिष्ट्यपूर्ण करणारे अधीक्षक अभियंता महाजन रामजी उप्पलवाड हे आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.उमरी तालुक्यात जन्मलेल्या महाजन उप्पलवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी एका कंत्राटदाराकडे पंधराशे रुपयावर सहा महिने काम केले. त्यानंतर 1990 मध्ये त्यांची नेमणूक पाणीपुरवठा क्षेत्रात सहायक अभियंता श्रेणी- या हुद्यावर झाली. कंत्राटदाराकडे केलेल्या कामाचा अनुभव त्यांना नोकरीत उपयोगी पडला. नोकरी करीत असतानाच उप्पलवाड यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात त्यांनी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी आणि औरंगाबादच्या वाल्मि या संस्थेत भूमीव्यवस्थापनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांची बदली सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे झाली. याठिकाणी त्यांची पदोन्नती होवून सहायक अभियंता श्रेणी-1 या पदावर त्यांची नियुक्ती झाली. 20 जून 1994 रोजी वैभववाडी येथे ते रुजू झाले. 1994 मध्ये त्यांची बदली लातूरच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात सहायक अभियंता श्रेणी-1 या पदावर झाली. या पदावर त्यांनी 1994 ते 1999 अशी पाच वर्ष काम केले. या काळात त्यांनी भूकंपपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे उल्लेखनीय काम केले. त्यावेळी सरवाडी या गावातील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम काही वादामुळे अडले होते. परंतू उप्पलवाड यांनी आपले अधिकारी जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसनाचा प्रश्न उत्तमपणे सोडविला. 1999 मध्ये उप्पलवाड यांची नियुक्ती कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या कार्यालयात सहायक अभियंता श्रेणी- म्हणून झाली. त्यानंतर 2007 मध्ये त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून प्रशासनाने त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती दिली. 2009 मध्ये ते अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ नांदेड या कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून होते. या काळात त्यांनी सिंचन व्यवस्थापनाची कामे केली. 2015 मध्ये मुख्य अभियंता लघुसिंचन मंडळ ठाणे येथे अधीक्षक अभियंता म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर 2017 मध्ये नांदेडच्या अधीक्षक अभियंताऊर्ध्व पैनगंगा मंडळ या कार्यालयात अधीक्षक अभियंता म्हणून ते रुजू झाले. आज दि.31 ऑगस्ट रोजी ते अधीक्षक अभियंता म्हणून निवृत्त होत आहेत. आपल्या एकंदर सेवा कालाविषयी बोलतांना उप्पलवाड म्हणाले की, मला भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची संधी मिळाली आणि जलसिंचन व्यवस्थापनातील अनुभवामुळे आठ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचे काम मी करु शकलो, याचा मला जास्त अभिमान वाटतो. माझ्या मनावर अ.ल. परळीकर, अ.ल.पाठक आणि अ.प्र.कोहिरकर या अ अद्याक्षराच्या अधिकाऱ्यांचा खोलवर परिणाम झाला आहे. शिस्त, जिद्द आणि कष्टाळू वृत्ती हे मी या तीन अधिकाऱ्यांकडून शिकलो. माझे आजोबा धोंडीबा उप्पलवाड यांचे उपकार मी विसरु शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
Related Posts
गुरुवारची कोरोना बातमी; सापडले पाच नवीन रुग्ण;दोन रुग्ण गंभीर
नांदेड,(प्रतिनिधी)- आज गुरुवारी कोरोना विषाणूने पाच नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २२ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी…
पत्नीची हत्या करून पत्तीने घेतला गळफास
किनवट तालुक्यातील भिसी येथे घडली घटना तिघांविरुद्ध इस्लापूर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल किनवट(प्रतिनिधी)-राहत्या घरात पत्नीची हत्याकरून पत्तीने नायलोन दोरीने राहत्या…
जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन…