चार पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक आणि सोळा पोलीस उपनिरीक्षकांचे जिल्ह्यात खांदेपालट

नांदेड- (प्रतिनिधी)- अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जिल्ह्यात ४ पोलीस निरीक्षकांचे खांदेपालट केले आहे. यामध्ये ३ जण तोंडी आदेशाने गेले होते, त्यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. सोबतच पाच सहायक पोलीस निरीक्षक आणि १६ पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण २५ अधिकार्‍यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून अन्यायग्रस्त असलेले देशपांडे यांना सुद्धा नियुक्ती देऊन प्रमोदकुमार शेवाळे न्यायभावना दाखविली आहे.
नव्याने नियुक्ती देण्यात आलेले पोलीस निरीक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिली आहे. प्रशांत गोविंदराव देशपांडे-जिल्हा विशेष शाखा (शहर वाहतुक शाखा), अशोक तुकाराम जाधव – नियंत्रण कक्ष (पोलीस ठाणे अर्धापूर), संतोष बापुराव तांबे-नियंत्रण कक्ष (लोहा),मोहन बाळासाहेब भोसले- नियंत्रण कक्ष(उमरी),असे आहेत. यातील अशोक जाधव, संतोष तांबे आणि मोहन भोसले पुर्वीपासूनच तोंडी आदेशावर कार्यरत आहेत. इतर तोंडी आदेशावरील पोलीस निरीक्षकांना नियुक्ती कायम न करून पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपला दूरदृष्टीपणा दाखवला आहे.
नवीन बदल झालेले सहायक पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे आहेत. विश्‍वंभर अर्जुनराव पल्लेवाड-पोलीस ठाणे लिंबगाव (नियंत्रण कक्ष), शंकर भागचंद डेलवाल -भोकर (इस्लापूर), नियंत्रण कक्षातील रसूल बशीरसाब तांबोळी यांना भोकर येथे पाठविण्यात आले आहे, संजय धोंडीबा निलपत्रेवार यांना पोलीस ठाणे वजिराबादमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. चंद्रकांत पंडीतराव पवार यांना लिंबगाव पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.
नवीन नियुक्त्या मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षक पुढीलप्रमाणे आहेत. नियंत्रण कक्षातील बालाजी महादू गाजेवार-विमानतळ सुरक्षा पथक, रेखा बन्सी काळे- पोलीस ठाणे लोहा, गजानन विजय अन्सापुरे- मुखेड, बालाजी हौसाजी किरवले-तामसा, रवी यादवराव बुरकुले- विमानतळ, श्रीकांत माधवराव मोरे- देगलूर, माधुरी अजयराव यावलीकर-मुदखेड, महेश अशोक कोरे- नांदेड ग्रामीण, विजय पुंडलीकराव पाटील-नांदेड ग्रामीण, श्रीधर हनुमंतराव तरडे – सी-४७, लहु रामजी घुगे-भाग्यनगर, गंगाधर विठ्ठल लष्करे-शिवाजीनगर (नियंत्रण कक्ष), सौेमित्रा रामराव मुंडे-वजिराबाद (भाग्यनगर), शेख जावेद शेख शब्बीर-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण (विमानतळ), कल्याण किशनराव मांगुळकर-अर्धापूर (वाचक पोलीस उपअधीक्षक कार्यालय धर्माबाद) असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *