नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले एक वरिष्ठ श्रेणी लिपीक आणि सहा पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला.
दि. 31 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक रंगनाथ देवीदास चौधरी, पोलीस अंमलदार श्रीपती माणिक नकाते-पोलीस मुख्यालय नांदेड, बाबु भीमराव वाघमारे-पोलीस मुख्यालय नांदेड, शिवाजी रामराव मुस्तापूरे-पोलीस ठाणे कंधार, सुभाष राजाराम धनावत-सिंदखेड, सिराज अली हैदर अली सय्यद-मांडवी आणि जयसिंग किशनसिंग चौधरी-किनवट असे 8 जण सेवानिवृत्त झाले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात या सर्व सेवानिवृत्तांना पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सहकुंटूब शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला आणि भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधीक्षक विकास तोटावार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस निरीक्षक चोरमले यांनी केले. महिला पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात महत्वपूर्ण भुमिका निभावली.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सेवानिवृत्तांना दिला भावपूर्ण निरोप