आरटीओ विभागात दोन नवीन इंटरसेक्टर वाहने दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक परिवहन विभागाने दोन अद्यावत वाहन आज आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत. ज्यामुळे मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करणे अधिक सोपे होणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे की, नांदेडच्या वायूवेग पथक ताफ्यात दोन नव्या इंटरस्पेटर वाहने नव्याने दाखल झाली आहेत. या वाहनांमध्ये अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश आहे. या वाहनांमध्ये ब्रिथ ऍनलाईजर, स्पिडगण, टींटमिटर अशा उपकरणाचा समावेश आहे. या सोयीमुळे वेगमर्यादा उल्लंघन करणारे वाहने आणि मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
या वाहनांचा क्रमांक एच.एच.04 के.आर.6426 आणि एम.एच.04 के.आर.6459 अशी आहेत. या वाहनांच्या कामकाजाची सुरूवात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, मोटार वाहन निरिक्षक प्रमोद घाटोळ, मेघल अनासने, सुनिल पायधन, पंकज यादव, मनोज चव्हाण, पद्माकर भालेकर, राघवेंद्र पाटील, सहाय्यक मोटारवाहन निरिक्षक चेतन अडकटलवार, लिपिक गाजुलवाड, शिंदे, कंधारकर, पवळे यांच्यासह सर्व कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *