नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांना दि.4 व 5 सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने प्रसिध्दीसाठी पाठवली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने जनतेला आवाहन केले आहे की, काळेश्र्वर, विष्णुपूरी येथे पंप दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आणि जल शुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या पाईपलाईनमधून गळती होत असल्यामुळे त्याची दुरूस्ती होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच दि.4 व 5 अशा दोन दिवशी जलशुध्दकरण केंद्र असदवन येथे येणारा पाणी पुरवठा होणार नाही आणि त्यामुळे जनतेला होणारा पाणी पुरवठा बंद राहिल. जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड शहरात 4 व 5 सप्टेबर रोजी पाणी पुरवठा होणार नाही