राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचा परतावा कसा द्यावा यासाठी नियमावली तयार

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागूर असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती, बडतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे अशा घटनामध्ये त्याचा अंशदान प्रतावा कसा द्यावा याबाबत नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागातील उपसचिव इंद्रजित गोरे यांची या शासन निर्णयावर डिजिटल स्वाक्षरी आहे.
राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना लागू झाल्यानंतर त्या योजनेतील कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीतील मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती झाल्यानंतर कोणत्यापध्दतीने निवृत्ती वेतन निधी व इतर फायदे द्यावेत या संबंधाचे नियम आहे. पण राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या व्यक्तीला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्याचा अंशदान परतावा देण्याबाबतची नियमावली तयार नव्हती ती आता तयार करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त केल्यास, सेवेतून काढून टाकल्यास, बडतर्फ केल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रान खात्यावरील अंशदानाची रक्कम परत करण्यात यावी. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील त्यांचा परतावा त्यांच्या प्रान खात्यात जमा असलेल्या अंशदानासह त्यावरील लाभासह परत द्यावा.
हा निर्णय जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त अनुदानीत अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नीत मान्यता प्राप्त व अनुदानीत महाविद्यालये, कृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना योग्य फेरफारासह लागू राहिल. राष्ट्रीय सेवानिवृत्त वेतन योजनेच्या बाबत घेतलेला हा निर्णय राज्य शासनाने संकेतांक 202109011138158305 यानुसार आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *