नांदेड(प्रतिनिधी)-मटका या जुगारावर छोट्या-छोट्या कार्यवाह्या करून मटका आमच्या भागात चालत नाही असा देखावा करणाऱ्या पोलीसांना आता मटका चालकांनी खुले आवाहन करत मटका चक्क उघड्यावर खेळविण्यास सुरूवात केली आहे.
शहरात मटका जुगारावर आमचे नियंत्रण आहे आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो असे सांगून पोलीस कार्यवाही केल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्षात तसे असते काय? याचा शोध घेतला तेंव्हा भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉम्प्लेक्समध्ये एका मटका बुक्की चालकाने आपली दुकानातील बुक्की बंद करून आता चक्क उघड्यावर मटका जुगार खेळविण्यास सुरुवात केली असल्याचे छायाचित्र प्राप्त झाले आहे. याची सविस्तर माहिती घेतली असता अगोदर हा मटका चालक त्याच कॉप्लेक्समध्ये दुकान भाड्याने घेवून मटका जुगार खेळवायचा पण कांही कारणास्तव त्याने ते दुकान बंद केले व आता त्यानेे चक्क उघड्यावरच मटका घेण्यास सुरूवात केली आहे असे छायाचित्रात दिसते.
प्राप्त झालेल्या छायाचित्रात मटका घेणारा खाली बसलेला आहे व त्याच्या आजू-बाजूने मटका खेळणारी मंडळी उभी असल्याचे दिसत आहे. एकूण मटका जुगार अगोदरही कधी बंद नव्हता आणि आजही बंद नाही तसेच पुढेही बंद होणार नाही अशीच परिस्थिती दिसते आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानातील जुगार उघड्यावर आणला