अर्धापूर (प्रतिनिधी)-पोळा व गणेशोत्सव काळात सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची खबरदारी घेत साजरे करावे असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले आहे.
आगामी काळातील पोळा व गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक अर्धापूर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे आदींचा उपस्थिती होती.
या बैठकीत नायब तहसीलदार सुनिल माचेवाड बोलतांना म्हणाले की, गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साजरा करावा असे आवाहन जनतेला केले आहे.
यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे म्हणाले की कोरोना नियमांचे पालन करा, गर्दी टाळा, घरीच श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा, कमीत कमी मंडळे स्थापन करा असे आवाहन फडसे यांनी केले.
पोलीस निरीक्षक अशोक जाधव म्हणाले की, उत्सव काळात रक्तदान, वृक्षारोपण, लसीकरण, स्वच्छता मोहीम, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करावे व कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. उत्सव काळजीपूर्वक जबाबदारीने करावा असे आवाहन जाधव यांनी केले आहे. यावेळी अनेकांनी सुचना मांडला आहेत.
या बैठकीस नगराध्यक्ष प्र.शेख लायक, उपनगराध्यक्ष प्र. डॉ विशाल लंगडे, राजाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव देशमुख,सचिन निळकंठ मदने, नगरसेवक गाजी काजी, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुस्वीर खतीब, सरपंच अमोल डोंगरे, स.प्र.कुलदीप सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख सदाशिव इंगळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादाराव शिंदे, पो.पा.शंकरराव कदम, अमृत राऊत, फिरदोस हुसेनी, गोविंद टेकाळे, इरफान पठाण, सरपंच सौ.मनिषा खंडागळे, अमोल इंगळे, अनिल इंगोले, युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव उमाकांत सरोदे, विजय भुस्से, कपील दूधमल, माधव पांचाळ, इम्रान सिद्दीकी, बाबुराव राजेगोरे,आनंद सिनगारे, अधिक्षक मदनकुमार डाके, तलाठी रमेश गिरी, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे, फौजदार कपील आगलावे, के.के.मांगूकर, विद्यासागर वैद्य, जमादार भिमराव राठोड,बालाजी कोकरे,धरमसिग राठोड, पप्पू चव्हाण, गुरूद्वास आरेवार, संजय घोरपडे, बालाजी भाकरे, राजेंद्र कांबळे, संदीप पाटील, बालाजी तोरणे, ईश्वर लांडगे, कीर्तीकुमार रणवीर,महेंद्र डांगे यांच्या अनेकांची उपस्थिती होती.
पोळा व गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांचे आवाहन