नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. या घरातील सचिन चव्हाण यांचे हात-पाय बांधून चोरट्यांनी 1 लाख 90 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे.

सचिन चव्हाण(मुकदम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 सप्टेंबर रोजी दिवसभर मी नवा मोंढा लोहा येथील दिनेश ट्रेडींग कंपनीवर काम करत होतो. रात्री 9 वाजता घरी गेलो आणि भोजन करून मी माझ्या पहिल्या मजल्यावरील कक्षात गेलो. मध्यरात्री 5 सप्टेंबरच्या 1 वाजेच्यासुमारास शेजारच्या रुममध्ये कांही तरी खडखड आवाज ऐकला आणि मी कक्षातून बाहेर निघालो. तेंव्हा त्या रुममध्ये चार जण होते आणि मला हिंदीमध्ये बाहेर ये असे म्हणत होते. आवाज करू नकोस असे सांगत त्यांनी माझ्या गळ्याला चाकू लावला आणि माझे कपडे काढून मला दौरीने बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. तपासणी करत दरोडेखोरांनी मलाच लाईट लावण्याचा हुकूम केला. त्यांनी माझ्या कक्षातील दोन अंगठ्या 42 हजार रुपये किंमतीच्या, सोन्याचे तोडे 16 ते 40 हजार रुपये किंमतीचे आणि एक लॅपटॉप संगणक 70 हजार रुपये किंमतीचा असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी या तक्रारीनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक संतोष तांबे अधिक तपास करीत आहेत.
लोहा शहरातील मुकदम घराणे हे प्रतिष्ठीत कुटूंबिय आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्वत: लोहा येथे जावून मुकदम यांच्या घरी भेट दिली आणि लोहा पोलीसांना आवश्यक त्या सुचना दिल्या.
अर्धापूर येथे 54 हजारांची चोरी
अमोल बाबाराव बारसे यांच्या शेतातील फॉर्म हाऊसवर 3 सप्टेंबरच्या सायंकाळी 7 ते 4 सप्टेंबरच्या पहाटे 8.30 वाजेदरम्यान त्यांनी कुलूप लावून घरी गेले असता कोणी तरी चोरट्यांनी त्या फॉर्म हाऊसचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि त्यातील 54 हजार 500 रुपये किंमतीचा विविध वस्तु चोरून नेल्या आहेत. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कोकरे अधिक तपास करीत आहेत.