नांदेड(प्रतिनिधी)-आज 7 सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली.
आज राजे उमाजी नाईक यांचा जन्मदिन आहे. त्यानुसार पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जीवीशाचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक बाबूराव शिंदे, ज्ञानेश्वर मुलगिर, जनसंपर्क कार्यालयाचे पोलीस अंमलदार सुर्यभान कागणे, रेखा इंगळे यांच्यासह विविध शाखांमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक कार्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी