नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड अर्धापूर रस्त्यावरील पिंपळगाव फाट्याजवळ एक जबरी चोरीचा प्रकार घडला आहे. कॅनाल रोड कृष्णानगर येथे एक घर चोरट्यांनी फोडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एटीएम जवळून एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. या तिन चोरी प्रकारांमध्ये 1 लाख 21 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
बाजीराव बालाजी माटे हे 7 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास अर्धापूरकडून नांदेडकडे येत असतांना त्यांच्यासोबत भाऊ विनायक माटे हा पण होता. त्यांच्या दुचाकी मागून दुसऱ्या एका दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीला थांबवून त्यांना काठीने मारहाण केली आणि एकाने तोंडावर कोणता तरी स्प्रे मारुन बळजबरीने त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.4155 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी, 1 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि 900 रुपये रोख रक्कम असा एकूण 31 हजार 900 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आगलावे अधिक तपास करीत आहेत.
डॉ.गिरीश वसंतलाल जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान त्यांचे सर्व कुटूंबिय बाहेर गावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कुलूप कोंडा तोडून आती 48 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कळणे अधिक तपास करीत आहेत.
9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4 अशा तीन तासाच्या वेळेत प्रकाश मांजरमकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एटीएमजवळ उभी केलेली त्यांची एम.एच.26 एफ ओ 040 ही 42 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी कोणी तरी चोरून नेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार अनिल झांबरे हे करीत आहेत.
नांदेड-अर्धापूर रस्त्यावर जबरी चोरी, कॅनाल रोडवर घर फोडले, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मोटारसायकल चोरी