नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी खुर्द ता.किनवट येथे एका घरात शिरून महिला, वृध्द यांच्यासह अनेकांवर हल्ला करणाऱ्या आठ जणांविरुध्द जीव घेणाहल्ला या सदरात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला किनवट पोलीसांनी अटक केली आहे.
बालाजी संजय गिते यांनी या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजता त्यांच्या घरात प्रशांत राजेंद्र मुंडे, संदीप केशव मुंडे, चंद्रकांत केशव मुंडे, माधव तुकाराम मुंडे, सुहास राजेंद्र मुंडे, नितीन राजेंद्र मुंडे आणि यश राजेंद्र मुंडे हे सर्व लोक आले आणि त्यांनी तु योगेश गित्ते सोबत का राहतो या कारणासाठी त्याच्या आईला मारहाण केली, प्रशांत राजेंद्र मुंडेने कुऱ्हाड बालाजी गित्तेच्या डोक्यात मारून डोके फोडले, कोणी त्याच्या पायावर मारून त्याला फॅक्चर केले. यासोबत वडीलांना सुध्दा मारहाण केली. किनवट पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 307, 452, 143, 147, 148, 149, 504, 506 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एम.डी. राठोड हे करीत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी प्रशांत राजेंद्र मुंडे यास अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सात जणांनी मिळून केलेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणात एकाला अटक