नांदेड(प्रतिनिधी)-सिध्दार्थनगर सांगवी येथील एका युवकाचे नांदेड येथील येथील युवतीसोबत पुण्यात शिक्षण घेतांना जुळलेल्या प्रेमसंबंधांना लग्नात बदलण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न अपयशी ठरला. 5 सप्टेंबर रोजी युवतीचे वडील आणि इतर लोकांनी मिळून प्रेमी युवकाला जबर मारहाण केली. हा प्रकार असदवन शिवारात घडला.
नांदेड येथे सिध्दार्थनगर सांगवीमध्ये राहणारा गौरव देशमुख हा पुण्यात शिक्षण घेत आहे. नांदेडचीच एक युवती त्याच्यासोबत शिक्षणासाठी पुण्यात आहे. आपली ओळख प्रेमात बदलली त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत युवतीच्या आई-वडीलांना परवानगी मागण्यात आली. पण प्रेम विवाहला विरोध असल्याने युवतीचे वडील उदय देशमुख व इतर दोन साथीदारांनी 5 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास असदवन परिसरात युवकावर धार-धार शस्त्राने हल्ला केला. गौरव देशमुखच्या पोटात चाकूची जबर जखम झालेली आहे. गौरव देशमुखच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील हे करीत आहेत.
प्रेमाचे रुपांतर लग्नात होण्याअगोदर प्रेमवीर युवकावर जबर हल्ला