दिनेश मुधोळ
नांदेड-शहरातील चैतन्यनगर भागात राहणार्या एका कुटूंबाने आपल्या घरातील पाळीव प्राण्याचा वाढदिवस साजरा करुन प्राणीमात्रावर दया करण्याचा संदेश दिला आहे.
शहरातील चैतन्यनगर भागातील त्रिवेणी नगर परिसरात विठ्ठल तुकाराम चव्हाण हे राहतात. अर्धापूर तालुक्यातील शेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी जिनी नावाची कुत्री पाळलेली असून या पाळीव प्राण्याला ते मुलांसारखी वागणूक देतात एवढेच नव्हे तर नुकतेच त्यांनी जिनीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. जिनीच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांनी प्राणी देखील आपल्या घरातील सदस्य असल्याचे दाखवून दिले. विठ्ठल चव्हाण यांना एक मुलगा व मुलगी असून जिनीला देखील ते मुलीप्रमाणे वागणूक देतात.विठ्ठल चव्हाण हे लहान पणा पासून प्राणिमात्रावर जीव पाड प्रेम करतात त्रिवेणी नगर येथील राहत्या घरी आज पण अलग अलग जातीचे 150 ते 200 चिमणी चे पालन करत, पाळीव प्राण्याचा वाढदिवस साजरा करुन त्यांनी प्राणीमात्रावर दया करण्याचा संदेश दिला असून त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
