नांदेड(प्रतिनिधी)-तथाकथीत महाराष्ट्र भूषण शेख जाकीर शेख सगीरने आपल्या व्हॉटसऍप स्टेटसवर बदनामी कारक शब्द लिहिल्यावरून नांदेड चौफेरचे संपादक यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी शेख जाकीर विरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.
दि.13 सप्टेंबर रोजी नांदेड चौफेरचे संपादक मो.आरेफ खान मो.दुलेखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी शेख जुनेद शेख मेहताब यांनी त्यांना कळविले की, व्हॉटसऍपवर शेख जाकीर शेख सगीरने तुमच्यासाठी बदनामीकारक शब्द छापले आहे. या शेख जाकीरने लिहिलेल्या शब्दाचा फोटो मोहम्मद आरेफ खान पठाण यांच्याकडे उलब्ध झाला. त्यावर एक तोंड लपवलेला माणूस हातात तिन कुत्रे धरुन आहे. त्या फोटोवर असे शब्द आहेत की, ” जो मेरी बराई करते फिरते है मैने उनके जैसे बहोत पाल रखे है’ या शब्दांसोबत खाली आरीफ दलाल और रामप्रसाद जेसे कुत्ते असे शब्द लिहिले आहेत. या पुर्वी सुध्दा 7 सप्टेंबर रोजी नायक नही खलनायक हु मै तेरे जेसे भडवे के लिये खतरनाक हु मै असे लिहुन त्या खाली इंग्रजीमध्ये ओनली फॉर आरीफ दलाल ऍन्ड रामप्रसाद असे लिहिलेले आहे. दैनिक चौफेर नांदेड या वर्तमान पत्रात सत्य बातमी छापल्यामुळे असे स्टेटस ठेवून शेख जाकीर शेख सगीर मोबाईल क्रमांक 9975985944 हा मोबाईल धारक बदनामी कारक कृत्य करत आहे. त्या व्यक्तीवर योग्य कार्यवाही व्हावी. या अर्जावरून इतवारा पोलीसांनी तथाकथीत महाराष्ट्र भूषण शेख जाकीर शेख सगीर विरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.
या व्हॉटसऍप स्टेटसबद्दल बोलतांना मोहम्मद आरेफ खान पठाण म्हणाले त्याच्या या स्टेटस ठेवण्यावरुन त्याचा डीएनए कोणत्या प्रकारचा आहे. हे आम्हाला नव्हे तर जगाला कळले आहे. त्याचा खोटारडेपणा आम्ही समाजापुढे उघड करत आहोत त्यामुळे तो असे कृत्य करून आम्हाला भिती दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. जिओग्राफी चॅनेल एकदा त्या तथाकथीत महाराष्ट्र भूषणने पहावे त्यात कळेल की जगात सर्वात उत्कृष्ट शिकारी कुत्रा असतो. सोबतच त्याने कोणते कुत्रे पाळले आहेत तेच त्याला पुढे कधी दाखवतील यावर आमचा दृढ विश्र्वास आहे.
तथाकथीत महाराष्ट्र भूषण शेख जाकीर विरुध्द इतवारा पोलीसांनी नोंदविला गुन्हा