नांदेड(प्रतिनिधी)-कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी एक नवीन मार्ग तयार झाला आहे. या अंतर्गत आकाश किशन शिंदे या विद्यार्थ्याने ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली.

राजर्षी छत्रपती शाहु महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील विद्यार्थी आकाश किशन शिंदे यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुत या योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत शेतकऱ्यांनी त्याचा फायदा कसा घ्यावा यासाठी भरपूर मेहनत घेतली. शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया, त्याचे फायदे, माती परिक्षण का करावे, नवीन औजारांची माहिती, शेतकऱ्यांशी संबंधीत पिक ओळख नियोजन व शेतीविषयक शासनाच्या योजना, निबोली अर्क कसे बनवावे. पाणी व्यवस्थापन कसे करावे. बीज उगवण क्षमता चाचणी कशी घ्यावी, फळबाग तसेच विविध फळांचे रोपण कसे करावे यासह अनेक शेतकऱ्यांशी निगडीत कामांबद्दल शेतकऱ्यांना माहिती देतांना प्रात्यशिक्षक करून दाखविले. यावेळी शेतकरी बालाजी शिंदे, दशरथ शिंदे, कमलाकर शिंदे, संतोष शिंदे, आनंद कोकणे, हौसाजी शिंदे व इतर शेतकरी उपस्थित होते.