शहरातील प्रभाग क्रमांक 8 डॉ.आंबेडकरनगर भागात कामांची सुरूवात

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील प्रभाग क्र.8  डॉ.आंबेडकर नगरमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक भौतिक कामांची सुरूवात आज नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या प्रयत्नांनी सुरूवात झाली. या प्रसंगी नागरीकांनी नगरसेवक संदीप सोनकांबळे यांचा सत्कार केला.


डॉ.आंबेडकरनगर भागातील साहेबराव सावंत यांच्या घरापासुन ते द्रोपदाबाई अटकोरे यांच्या घरापर्यंत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मलवाहिनी (नविन ड्रेनेज लाईन)टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली. याप्रसंगी नगरसेवक संदिप ं सोनकांबळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर यश आले असून आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. या कामाच्या सुरुवातीस डॉ.आंबेडकरनगरमधील नागरीकांनी नगरसेवक संदीप सोनकांबळे यांचा सन्मान करून धन्यवाद दिले.
याप्रसंगी सत्यपाल सावंत,ऍड.केशवदादा हनमंते,साहेबराव सावंत, सदाशिव सावंत,गंगाधर लांडगे,कंथक सुर्यतळ,सुभाष कांबळे,मोनु वाघमारे, गंगाधर ओढणे,अजित किन्नीकर,सोनु जोंधळे,कृष्णा सुर्यतळ,गौतम कुंठे,शारदाबाई वाघमारे,इंदुबाई कसबे,भारतबाई सोनकांबळे,द्रोपदाबाई अटकोरे,रत्नाबाई सावंत,केवळाबाई सावंत,पोटफोडे बाई तसेच परीसरातील थोरमोठे व युवक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *