राज्यातील १२ आयपीएस अधिकाऱ्यांना आता कायम नियुत्या; नांदेड जिल्ह्यातील बिलोली उप विभागात चांडक

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील 70, 71, 72 या तुकडीतील 12 परिवेक्षाधिन अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस अधिक्षक या पदावर विविध उपविभागात नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नांदेड येथे बिलोली उपविभागात अर्चीत चांडक यांना नियुक्ती मिळाली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील कंधार, देगलूर आदी उपविभाग अद्याप रिकामेच आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अव्वर सचिव तुषार महाजन यांनी भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) मधील 70, 71 आणि 72 या तुकडीच्या महाराष्ट्रात परिवेक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षक या पदावर काम करणाऱ्या 12 अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नवीन अधिकारी त्यांचा प्रशिक्षण कालावधी आणि नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे.
नवीन 12 सहाय्यक पोलीस अधिक्षकांमध्ये अर्चीत विरेंद्र चांडक-जळगाव(उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली), एम.रमेश-नंदुरबार(कळम, उस्मानाबाद), रितु-सातारा(आकोट, आकोला), अभिनव त्यागी-अहमदनगर(मल्लकापूर, बुलढाणा), आयुष नोपाणी-अहमदनगर(वरोरा, चंद्रपूर), गौहार हसन-जालना(धर्णी, अमरावती), निकेतन बन्सीलाल कदम-अमरावती ग्रामीण(चाकूर, लातूर), श्रेणीक दिलीप लोढा-अमावती ग्रामीण(गंगाखेड, परभणी), अजित्य धनंजय मिरखेलकर-सांगली(दारव्हा, यवतमाळ), नित्यानंद झा-सांगली (बोईसर, पालघर), पंकज कुमावत-धुळे (केज, बीड), ऋषीकेश प्रदीप रावले-उस्मानाबाद(चोपडा, जळगाव).
अशा 12 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना त्वरीत प्रभावाने नेमणूकीच्या ठिकाणी हजर व्हावे असे आदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगघल यांनी दिले आहेत. नांदेडच्या बिलोली उपविभागात नियुक्ती मिळालेले अर्चीत विरेंद्र चांडक यांचा जिल्हा प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाला नाही. तो पुर्ण झाल्यावर त्यांना बिलोली येथे हजर होण्यासाठी कार्यामुक्त करायचे आहे असे आदेशात लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *