नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील एक नामांकित व्यक्तीमत्व माधवराव देवसरकर यांच्याविरुध्द एका विवाहितेने दिलेली विनयभंगाची तक्रार नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल करून घेतली नाही. त्यानंतर त्या विवाहितेच्या पतीने माधवराव देवसरकर यांचा खरा चेहरा पत्रकार परिषदेत मांडला. विवाहितेच्या पतीने पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे मी माधव देवसरकर सोबत एक कार्यकर्ता होतो. पण त्याची विकृतबुध्दी आहे हे मला कळलेच नाही. एका रात्री पावणे बारा वाजता माधव देवसरकरने त्यांच्या पतीना व्हॉटसऍप संदेश पाठवला. पहिली चुक म्हणून आम्ही क्षमा केली. कारण माझी आई सुध्दा माधव देवसरकरला आपला मुलगा समजत होती. याबद्दल आता इतरही महिला आपला वाईट अनुभव सांगत आहेत असे पिडीतेचे पती म्हणाले. याबद्दल आम्ही तक्रार देण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथे हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी माझ्या पत्नीला दीड तास बसवून घेतले आणि एकांतात विचारपुस केली आणि दुसऱ्या दिवशी या असे आम्हाला सांगितले. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गेलो तेंव्हा अधिकारी आजारी आहेत असे सांगून तुमची फिर्याद खोटी असल्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि आमची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यामुळेच आम्ही आज पत्रकार परिषदेत सामाजिक नेता असल्याचा बुरखा घालून माधव देवसरकर महिलांसोबत अश्लील आणि विकृत वागणूक दाखवत आहे. या प्रसंगी पत्रकार परिषदेत विविध संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त पदाधिकारी सत्कार समारंभ दि. २४ जुलै रोजी
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तमाम पद्मशाली समाजातील विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात येते की, मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नांदेड जिल्हा…
26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रॅली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन नांदेड, (जिमाका) – संविधान दिनानिमित्त रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023…
बुधवारी कोरोना बातमी; सापडले दोन नवीन रुग्ण;दोन रुग्ण गंभीर
नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने दोन नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २० आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी…