नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागात मुख्य वस्तीत फटाके विक्री करणाऱ्या एका दुकानदाराविरुध्द स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 1 लाख 26 हजार 857 रुपयांचे फटाके जप्त करून दुकान मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात काल श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत काम करणारे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ यांना वजिराबाद भागात अवैधरित्या फटाके विक्रीची दुकान दिसली. त्यावेळी दत्तात्रय काळे यांनी पंचासह 19 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजता त्या दुकानात छापा टाकला. तेथे अनिल बालाप्रसाद मंत्री (50) हे व्यक्ती हजर होते. त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या 12 प्रकारचे एकूण 1 लाख 26 हजार 857 रुपये किंमतीचे फटाके जप्त करण्यात आले.
पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी अनिल बालाप्रसाद मंत्री यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 331/2021 भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 286 आणि बारी पदार्थ अधिनियम 1884 च्या कलम 9 (ब) नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांच्याकडे दिला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने मंत्री फटका विरुध्द गुन्हा दाखल केला