नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी नव्याने पदोन्नती प्राप्त 13 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. हे सर्व पोलीस उपनिरिक्षक नियंत्रण कक्षात कार्यरत होते.
नांदेड जिल्ह्यात पदोन्नती प्राप्त 13 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्यांचे आदेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आज पारीत केले आहेत. नवीन नियुक्त्या पुढील प्रमाणे आहेत. प्रदीप भानुदास गौड, नागोराव वसंतराव जाधव-विमानतळ, जळबाजी एकनाथ गायकवाड, मिलिंद मधुकर सोनकांबळे-शिवाजीनगर, सुनिल अशोक भिसे, गणेश बापूराव कदम-भाग्यनगर, ज्ञानोबा त्र्यंबक मुलगीर-उमरी, प्रकाश केरबा पाईकराव-वाचक पोलीस उपअधिक्षक बिलोली, दिलीपकुमार निवृत्तीराव वाघमारे, विश्र्वनाथ विठ्ठल बोईनवाड-नियंत्रण कक्ष, अमोल विठ्ठल गुंडे-जिल्हा विशेष शाखा, मोहम्मद तय्यब अब्बास-अर्धापूर, संजय तुकाराम गायकवाड-हदगाव अशा या नवीन नियुक्त्या आहेत.
पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर नियंत्रण कक्षात नियुक्ती असलेल्या परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण या पोलीस उपनिरिक्षकांना मात्र कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही. कारण ते अगोदर पासूनच तोंडी आदेशाने नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत. त्यांना मिळालेला तोंडी आदेश कायम का झाला नसेल ?