नांदेड(प्रतिनिधी)- दोन महिलांच्या गळ्यातील 1 लाख 52 हजारांचे दोन गंठण चोरी झाल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत. एक दिवस अगोदर सुध्दा एका महिलेचे गंठण तोडल्याचा प्रकार घडला होता.
संगीता माधव बोडके या महिला आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.डब्ल्यू 2586 वर बसून रतननगर जैन मंदिर, मालेगाव रोड या मार्गे छत्रपती चौकाकडे जात असतांना कोणी तरी त्यांच्या पाठीमागून बिना नंबरच्या मोटारसायकलवर दोन जण आले आणि त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची 21 ग्रॅम वजनाची चैन तोडून पळून गेले. या ऐवजाची किंमत 62 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कदम हे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत समता बॅंक दिलीपसिंघ कॉलनी येथून मेहुल हसमुख पिठाडीया यांच्या आजीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण किंमत 90 हजार रुपयांचे दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव अधिक तपसा करीत आहेत. या दोन्ही घटना 20 सप्टेंबर रोजी घडल्या आहेत. 18 सप्टेंबर रोजी सुध्दा एका महिलेचे गंठण डॉक्टर्सलेन वजिराबाद येथून चोरट्यांनी चोरून नेले होते.
1 लाख 52 हजारांचे दोन दोन महिलांचे गंठण तोडले