नांदेड(प्रतिनिधी)-दोन दुचाकीसह महाराष्ट्र राज्य विज वितरणाची 64 किलो तांब्याची तार चोरी गेल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत.
अंकुश नामदेव घनमोडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.1748 ही 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी 19 सप्टेंबरच्या दुपारी 3 वाजता अंबीकानगर येथील त्यांच्या दुकानासमोरून कोणी तरी चोरली आहे. भाग्यनगर पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
विठ्ठल सखाराम गोबाडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एक्स.8495 ही 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 20 सप्टेंबरच्या दुपारी डॉक्टर्सलेनमधून चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.
लिंबगाव येथील विजय वितरण कंपनीचे मुख्य तंत्रज्ञ नारायण गंगाधर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लिंबगाव शिवारातील फुलाजी आनंदराव कदम यांच्या शेतातील विद्युत रोहित्र फोडून त्यातील 64 किलो तांब्याची तार 2500 रुपये किंमतीची कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. रोहित्र खाली पाडून त्यातील ऑईलचे नुकसान केले आहे. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक जहागिरदार अधिक तपास करीत आहेत.
दोन दुचाकी चोरी;वीज वितरणची 64 किलो तांब्याची तार चोरी