आपल्या बालिकेचा खून करणाऱ्या आई विरुध्द अबेटेड समरी गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलीसह विहिरीत उडी मारून जीव देणाऱ्या महिलेविरुध्द आपल्याच बालिकेचा खून केला अशा स्वरुपाचा अबेटेड समरी गुन्हा देगलूर पोलीसांनी दाखल केला आहे.
11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजेच्या दरम्यान नागोबाई बालाजी पवार या महिलेने आपली 4 वर्षीय मुलगी गंगासागर बालाजी पवार रा.उंद्री हिला करेगाव  शिवारातील एका विहिरीत फेकून देवून स्वत: जीव दिला होता. याबाबत सुरूवातीला अकस्मात मृत्यू क्रमांक 34/2021 दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संगमनाथ परगेवार यांच्याकडे होता.

      याबाबतचा तपास सुरू असतांना समोर आलेल्या घटनेनुसार कारेगाव शिवारातील असलेल्या गुड्‌ूसाब रसुलसाब बागवान यांच्या शेतातील विहिरीत नागुबाई पवारने आपली 4 वर्षी बालीका गंगासागर बालाजी पवार हिला पाण्यात फेकुन देवून तिचा खून केला आणि स्वत: त्या पाण्यात उड्डी मारून आपला जीव दिला. नागूबाई पवार यांच्या डोक्यात नेहमी दुखत असे. तो आजार बरा होत नाही म्हणून त्यांनी असे केल्याचे तपासात समोर आले. आता संगमनाथ परघेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नागुबाई बालाजी पवार यांनी आपली बालिका गंगासागर पवार यांचा खून केल्याचा अबेटेड समरी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक कमलाकर गड्डीमे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *