समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जारी केले पत्र
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी पाठविलेल्या पत्रानुसार विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक करू नये.
कांही विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी जाहीर केलेल्या पत्रानुसार आदित्य पाटील शिरफुले यांचा अर्ज त्यांच्याकडे आला होता. त्यात शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 20-21 शिष्यवृत्ती अर्ज मंजुर झालेल्या पण त्यासाठी आवश्यक कागदपत्रांमुळे ही शिष्यवृत्ती प्राप्त होत नाही असा आशय आहे. त्यासाठी शासन परिपत्रक दि.20 जुलै 2020चा संदर्भ जोडून पत्र निर्गमित करण्यात आले आहे.
या पत्रानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र ज्यात टी.सी. आणि मार्कमेमो हे देण्यासाठी महाविद्यालयाकडून अडवणूक होत आहे. या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज झालेले आहेत. परंतू त्यांना कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे ती शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही. कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करून नये अन्यथा महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याबाबत संबंधीत प्राधिकरणाकडे शिफारस करण्यात येईल असे या पत्रात लिहिले आहे. एकाही मागासवर्गीय विद्यार्थ्याचे कागदपत्राअभावी शैक्षणिक नुकसान झाले तर त्याची संपुर्ण जबाबदारी त्या महाविद्यालयाची असेल असे या पत्रात लिहिले आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी निर्गमित केलेले हे पत्र नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांना पाठविण्यात आले आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची अडवणूक केली तर कॉलेजची मान्यता रद्द होईल