हिंगोली(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वाहतुक शाखेने आणि 11 पोलीस ठाण्यांनी मिळून 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये 25 लाख 2 हजार 150 रुपयांची दंड वसुली केली आहे. 19 हजार 800 प्रलंबित चालान निकाली काढले आहेत. हिंगोलीचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात हिंगोली पोलीस विभागातील वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 3764 प्रलंबित चलन निकाली काढले आहेत आणि त्यातून 14 लाख 16 हजार 250 रुपये वसुल केले आहेत.

हिंगोली येथील पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी वाहतुक शाखेचे कामकाज करण्यास सुरूवात केली. मागील कांही दिवसांमध्येच त्यांनी केलेली कामगिरी दैदिप्यमान आहे. राकेश कलासागर यांच्यासोबत हिंगोली शहरभर फिरून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि आपल्या कामकाजाला सुरूवात केली. 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालखंडा हिंगोली पोलीसंानी 19800 प्रलंबित मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहनधारक आणि मालकांना देण्यात आलेले चालान समाप्त केले आहेत. या चालानासाठी एकूण 25 लाख 21 हजार 950 रुपये तडजोड फिस वसुल करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वाहतुक शाखेचे कामगिरी यात सर्वोत्कृष्ट असून त्यांनी 14 लाख 16 हजार 250 रुपये तडजोड शुल्क वसुल केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील 11 पोलीस ठाणे आणि वाहतुक शाखा यांचा एकत्रीत तडजोड शुल्क वसुली आकडा 22 लाख 69 हजार 250 रुपये एवढा आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हिंगोली यांना सादर करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याने 22 ते 24 सप्टेंबर या कालखंडात 8 लाख 1 हजार 800 रुपये तडजोड शुल्क वसुली केली आहे. परभणी जिल्ह्याने 18 लाख 34 हजार अशी तडजोड शुल्क वसुली केली आहे. एकंदरीत प्राप्त आकडेवारीनुसार हिंगोली जिल्हा मोटार वाहन कायद्याअंतर्गत झालेल्या कार्यवाहीसाठी तडजोड शुल्क वसुलीमध्ये सध्या क्रमांक 1 वर आहे.