नांदेड(प्रतिनिधी)-आपले हॉटेल बंद करून घरी जाणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून 40 हजार 400 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेण्यात आला आहे. कलालगल्ली, इतवारा येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे. धनेगाव येथे घरासमोर ठेवलेले लोखंडी तारांचे 6 बंडल चोरीला गेले आहेत. या 3 चोरींच्या घटनांमध्ये एकूण 78 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
विठ्ठल गंगाधर पवार हे 24 सप्टेंबर रोजी त्यांनी काम करतात ते राज योग हॉटेल बंद करून रात्री 10.30 वाजेच्यासुमारास घराकडे जात असतांना कांही जणांनी त्यांना थांबवून खंजीर, लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण करून त्यांच्याकडून 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 40 हजार 400 रुपये किंमतीची बळजबरीने चोरून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गौंड अधिक तपास करीत आहेत.
शंकर बलभिमराव कुंटरवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 डी.900 ही गाडी कलाल गल्ली इतवारा येथून दि.23 सप्टेेंबरच्या सायंकाळी चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. इतवारा पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार कस्तुरे अधिक तपास करीत आहेत.
चंद्रकांत शंकरराव दाणेदार या कंत्राटदाराने आपल्या घरासमोर ठेवलेले लोखंडी तारांचे 6 बंडल ज्याची किंमत 18 हजार रुपये आहे ते 26 सप्टेंबरच्या दुपारी 4 वाजेदरम्यान कोणी तरी चोरून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुपडे अधिक तपास करीत आहेत.