नांदेड(प्रतिनिधी)-21 ऑगस्ट रोजी शहरातील उर्दु घर मधून पाण्याचे प्रेशर गे्रज चोरणाऱ्या चोरट्याला इतवाराच्या गुन्हे शोध पथकाने आज जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीचे साहित्य पण जप्त केले आहे.
दि.21 ऑगस्ट रोजी उर्दु घरचे व्यवस्थापक अब्दुल सलीम खान बिसमिल्लाह खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उर्दु घराच्या बाहेर पाण्याच्या मोटारींवर लावण्यात आलेले प्रेशर ग्रेज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे हा प्रकार उर्दु घराचे उद्घाटन झाल्यानंतर घडला होता. याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 206 /2021 दाखल झाला होता.
उर्दु घर हे नांदेड मधील नामांकित संस्थान आहे. येथे झालेली चोरी उघड करणे अत्यंत आवश्यक आहे. या पध्दतीने पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक गणेश गोटके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिलेल्या सुचने नुसार हा तपास सुरू होता. तांत्रिक दृष्ट्या आणि आपल्या माहितीच्या आधारावर आज दि.28 सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख यांना साहेबराव नरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शेख इजराईल शेख सादिक (25) मुळ रा.निजामाबाद ह.मु.खुदबईनगर नांदेड यास ताब्यात घेतले. त्याने चोरी केलेले प्रेशर ग्रेज जप्त करण्यात आले आहे. या पोलीस पथकात पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, हबीब चाऊस, ज्ञानेश्र्वर कलंदर, शिवानंद हंबर्डे, नरहरी कस्तुरे आणि दासरवाड यांचा समावेश आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी इतवारा गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.