नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर तालुक्यात, नांदेड शहरातील इतवारा भागात अनेक ठिकाणी खुले आम मटक्याची दुकाने सुरू आहेत. मटका हा धंदा चाललाच पाहिजे कारण त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. मटक्यामुळे देशाधडीला लागणारी मंडळी आपल्या मस्तीने त्या मार्गावर जाते असे मत मटका चालकांचे आहे. त्यामुळे मटका हा जुगार तसा वाईट नाही. म्हणून तो सुरू असला पाहिजे.
शहरातील इतवारा भागात जवळपास 130 मटक्यांच्या बुक्या आहेत. तसेच अर्धापूर तालुक्यातील दाभड, भोकर फाटा, लहान, लोण, मालेगाव, कामठा, अर्धापूर, वसमत रोड या ठिकाणी राजकीय मंडळींचा सहभाग घेवून मटका चालक आपला व्यवसाय करतात. मटका या जुगाराला जुगार कायद्यान्वये परवानगी नसेल तरी त्या व्यवसायातून असंख्य लोक आपल्या कुटूंबाचा उर्दहनिर्वाह करतात. त्यामुळे या जुगार व्यवसायाला चुकीचे कसे म्हणावे.
मटक्याच्या चिठ्या पाहिल्या तर त्यावर कांही चिठ्यांवर क्रमांक हा गुप्त संकेत लिहिलेला असतो तर कांही मटक्यांच्या बुक्यांवर इंग्रजी अल्फाबेटचा वापर करून वेगवेगळी अक्षरे लिहिलेली असतात. त्यातून बुक्की चालवणारा कोण आणि मालक कोण याचा बोध होतो. इतवाराच्या हद्दीत तर कांही 52 पत्यांचे जुगार अड्डे सुध्दा सुरू आहेत. इतवारा पोलीस ठाण्यातील एक सेवक नांदेड ग्रामीणच्या मलीद्याची वसुली करतो असे सांगितले जाते. विचारणा केली तर आमच्या भागात कांहीच नाही अशी टोलवा टोलवी होते. खरे तर मटका जुगार आणि 52 पत्यांचा जुगार हा बंदच करायला नको. कारण मटका चालक आणि जुगार चालकांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांच्या घरी जात नाही ते आमच्या घरी येतात. तेंव्हा देशोधडीला लागणाऱ्या नागरीकांचा तो स्वत:चा निर्णय आहे.
शहरातील इतवारा हद्दीत आणि अर्धापूर तालुक्यात मटक्या व 52 पत्यांचा जुगार जोमात