नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तीन चोरटे पकडले असून त्यांच्याकडून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन तोडण्याचे चार गुन्हे, मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा आणि मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. या तीन चोरट्यांकडून 2 लाख 32 हजार 167 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दि.20 सप्टेंबर रोजी दोन चोरटे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून पळून जात असतांना सजग नागरीकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि पोलीसांच्या स्वाधीन केले. या आरोपींच्या पुढील तपासणीमध्ये पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे, रमेश खाडे, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, विजयकुमर नंदे, मनोज परदेशी, संतोष बेल्लूरोड, चंद्रकांत बिरादार, बालाजी कदम, शरदचंद्र चावरे, व्यंकट गंगुलवार, शेख इमरान शेख एजाज यांनी पकडलेले तीन आरोपी राजेश उर्फ राजू उर्फ राजीव संजय चंदनशिवे (23) रा.गंगा कॉलनी, ओम उर्फ रितेश श्रीहरी बेंडले (21) रा.मंत्रीनगर आणि राहुल उर्फ सोन्या रमेश राऊत (19) रा.नवजीवननगर छत्रपती चौक नांदेड यांच्याकडून 6 तोळे सोन्याचे दागिणे किंमत 2 लाख 32 हजार 167 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या चोरट्यांनी वजिराबाद भागातील दोन आणि भाग्यनगर येथील दोन असे चार चैन तोडण्याचे गुन्हे कबुल केले आहेत. सोबतच एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा आणि एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
वजिराबाद पोलीसांनी महिलांचे गंठण तोडणारे तीन चोरटे पकडले