नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला दोन जणांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास गोदावरी नदी काठी घडला आहे.
अमरसिंघ रतनसिंघ नांदेडवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 सप्टेंबर रोजी ते आणि त्यांचे मित्र जसबिरसिंघ महेंद्रसिंघ बुंगई असे दोघे गोदावरी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदीकाठी गेले होते या दरम्यान तेथे मनप्रितसिंघ गोविंदसिंघ कुंजीवाले आणि अमितसिंघ बुंगई या दोघांनी जवळ येवून जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. अमितसिंघ बुंगईने त्याच्याकडील खंजीरने माझ्या डाव्या हाताच्या करंगळी जवळील बोटास मारून जखमी केले. मनप्रितसिंघ कुंजीवालेने त्याच्या जवळील खंजीरने माझ्या कंबरेजवळील डाव्या बाजूस जखम केली. मी तसाच पोलीस ठाण्यात आलो आणि पोलीसांचे पत्र घेवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेलो उपचार घेवून परत आल्यावर आज तक्रार देत आहे. वजिराबाद पोलीसांनी 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 323, 504, 506, 34 आणि भारतीय शस्त्र कायदा 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 349/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे हे करीत आहेत.
जुन्या भांडण्याच्या कारणावरून खंजीरने हल्ला दोघांवर गुन्हा दाखल