नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथील ऍट्रॉसिटी प्रकरणात आई आणि पुत्राची रवानगी विशेष न्यायाधीश आर.डी.गाढवे यांनी सध्या तुरूंगात केली आहे.
28 सप्टेंबर रोजी साहेब हरी मोरे रा.महात्मा गांधी नगर भोकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विक्की उर्फ विशाल सुरेश नर्तावार त्याचा भाऊ दिनेश सुरेश नर्तावार आणि आई-बहिण अशा चार लोकांविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 359/2021 दाखल झाला. यावेळी हे सर्व नर्तावार कुटूंबिय मुंबई येथील आझाद मैदानात भोकर पोलीसांविरुध्द उपोषणास बसलेले होते.
याप्रकरणाचे तपासीक अंमलदार पोलीस उपअधिक्षक गोपाळ रांजनकर यांनी एक पोलीस पथका पाठवून आई आणि त्यांचा मुलगा विशाल उर्फ विक्की सुरेश नर्तावार या दोघांना भोकर येथे आणले. आज न्यायालयात उपस्थित केल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्राप्त माहितीनुसार आज त्यांना वास्तव्यासाठी नांदेड तुरूंगात पाठविले आहे.
हे प्रकरण वेगवेगळे रंग घेत आज या परिस्थिती आहे. 5 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या प्रकरणात एका अपघातानंतर नर्तावार कुटूंबातील एका मुलाचे नाव आरोपी सदरात आले आणि नर्तावार कुटूंबियांनी पोलीसांविरुध्द मोहिम उघडली आणि पोलीसांविरुध्द मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले पण दरम्यान समाजकंठक असे शब्द लिहुन बदनामी केली, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावले त्यामुळे ऍट्रॉसिटी कायद्याचा भंग झाला अशी तक्रार साहेब मोरे यांनी दिल्यानंतर हा ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
भोकर येथील ऍट्रॉसिटी प्रकरणात आई आणि मुलाचे वास्तव्य तुरूंगात