नांदेड,(प्रतिनिधी)- नागपूर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय बडमिंटन स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी आणि काही पोलीस अंमलदारानी चमकदार कामगिरी करत विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे.
दिनांक १ व २ आक्टोबर दरम्यान नागपूर येथे होत असलेल्या या स्पर्धेत राज्यातून जवळपास १०० खेळाडू सहभागी झाले आहेत. आजच्या दिवसभरातील स्पर्धेच्या निकालानुसार या स्पर्धेत नागपूर,नांदेड व मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले.पोलीस निराक्षक मोहन भोसले व पोलीस उप निरीक्षक असद शेख या जोडीने नेत्रदिपक कामगीरी करीत ३ संघांना नमवून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला,तर ४५ वयोगटा वरील स्पर्धेत तैनात बेग व साजीद सिद्दीकी यांनीही उपांत्यपुर्व खेळीत प्रवेश केला.
स्पर्धेत अमरावतीचे पोलीस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, नांदेडचे माजी सहायक पोलीस अधीक्षकनुरूल हसन यांनी जी.ओ.सेक्शन मध्ये फायनल मध्ये प्रवेश केला.उद्या खेळाडूनी उत्कृष्ट कामगीरी करीत विजय संपादन करतील ही अपेक्षा आहे.नांदेडच्या खेळाडूला पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सर्व अधिकारी आणि अंमलदारानी विजयी भव अश्या शुभकामना दिल्या आहेत. या स्पर्धांमध्ये पोलीस अंमलदार संतोष पुलगमवार,माधव निर्मले,संतोष सोनसळे यांनी सुद्धा आपल्या एक एक स्पर्धा जिकल्या आहेत.