नांदेड(प्रतिनिधी)-महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि एसबीसी 3 यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह निर्मुलन पुनरावृत्ती सत्र घेण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला.
या कार्यक्रमात आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास योजना, एकात्मिक बाल संरक्षण योजना आणि चाईल्ड लाईनमधील 70 मास्टर ट्रेनर सहभागी झाले होते. या कार्यक्रमात महिला बालविकास अधिकारी शेख अब्दुल रशीद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग रेखा काळम, जि.प.अतिरिक्त आरोग्य अधिकरी चौधरी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी उपस्थिती राहुन मार्गदर्शन केले. कास्केडींग प्रशिक्षण हे डिसेंबर 2021 च्या आत जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर जावून घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्षा ठाकूर यांनी गुगल मिटच्या माध्यमातून दिला. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाल विवाह निर्मुलनासाठी वचन घेवून प्रतिज्ञा घेतली. बाल विवाह निर्मुलनाची ही चळवळ अधिक मजबुत करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर कार्य सुरू करण्यात आले आहे. हे कार्य गावपातळीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बाल विवाह निर्मुलनासाठी कार्यशाळा संपन्न