नांदेड(प्रतिनिधी)-येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत “श्री गुरु ग्रन्थ साहिब में अभिव्यक्त मानवता” या हिंदी विषयातून डॉ राजेंद्रकौर महाजन पिता स. हरमीतसिंघ (स. लड्डू सिंघ महाजन) यांना नुकतेच विद्यावाचस्पती ही पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ राजेंद्र कौर यांनी पीपल्स महाविद्यालयचे प्राचार्य प्रा. डॉ आर. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात आपला शोधप्रबंध पूर्ण केला. वरील शोध प्रबंधास विद्यापीठाने स्वीकृत दिली आहे. विद्यापीठाच्यावतीने आयोजित वायवा प्रक्रियावेळी त्रयस्थ परीक्षक प्रा. डॉ वंदन जाधव (बीड) आणि स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ भाषा व साहित्य संकुल संचालिका प्रा. डॉ शैलेजा वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शोधप्रबंधावर समाधान व्यक्त केले.यानंतर विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ उद्धव भोसले यांनी डॉ राजेंद्रकौर महाजन यांना पीएचडी पूर्ण झाल्याने शुभेच्छा देऊन सत्कार केला.
तसेच प्र. कुलगुरु प्रा. डॉ जोगेन्दर सिंह बिसेन यांनी सदिच्छा दिल्या. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स.लड्डूसिंघ महाजन, डॉ चरणजीतसिंघ महाजन आणि डॉ. परविंदरकौर महाजन-कोल्हापुरे, स. अजयसिंघ महाजन यांचीही उपस्थिती होती. श्री गुरु ग्रन्थ साहिब विषयातून विद्यापीठातून ही पहिलीच पीएचडी असल्याची माहिती आहे. पीएचडी पूर्ण केल्या बद्दल डॉ राजेंद्रकौर महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ राजेंद्रकौर महाजन यांना पीएचडी प्रदान