नांदेड(प्रतिनिधी)-एका 15 वर्षीय बालकाला पळविल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याबाबत पोलीसांनी शोध घेवून तो बालक तेलंगणा राज्यातील बोधन येथून परत आणला आहे.
आसरानगर भागातील एक 15 वर्षाचा बालक पळवून नेल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा क्रमांक 297/2021 दाखल करण्यात आला होता. विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या नेतृत्वात सायबर शाखेची मदत घेवून पोलीस उपनिरिक्षक रेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोधन, तेलंगणा येथून या बालकाला आईसह परत आणले आहे. प्राप्त माहितीनुसार आई-वडीलांमध्ये झालेल्या वाद-विवादामुळे आई लेकराला घेवून गुपचूप घेवून गेली होती. पण विमानतळ पोलीसांनी हा गुंतापण सोडविला आहे.
विमानतळ पोलीसांनी तेलंगणा राज्यातून बालक परत आणला