नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर्सलेन भागातील आर.के.डिस्ट्रीब्युटर्स या औषधी दुकानाला आग लागल्यामुळे संपूर्ण औषधी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असेल असा अंदाज आहे. अग्नीशमन दलाने अत्यंत जलद प्रभाव दाखवत या आगीला शांत केले.
डॉक्टर्सलेन भागातील राजेंद्र कुंडलसा जैन यांच्या मालकीचे आर.के.डिस्ट्रीब्युटर्स नावाचे औषधी दुकान आहे. आज दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास या दुकानात आग लागली. कांही कळण्याअगोदरच अगीने रौद्ररुप धारण केले. हे औषधी दुकान गुलाटी हॉस्पीटल या इमारतीतच आहे. पण आगीचा प्रभाव दवाखान्यावर होण्या अगोदरच अग्नीशमन दल तेथे पोहचले आणि त्यांनी आगीला शांत केले. महापौर मोहिनी येवनकर, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील आणि अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या ठिकाणी झालेल्या गर्दीला नियंत्रीत करून आग लवकरात लवकर कशी विझेल यासाठी परिश्रम घेतले. वृत्तलिहिपर्यंत आग पुर्णपणे विझली होती.आग कशी लागली याबद्दल आताच कांही सांगता येणार नाही. पण आगीमुळे झालेले नुकसान लाखो रुपयांमध्ये असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
डॉक्टर्सलेनमध्ये औषधी दुकान आर.के.डिस्टीब्युटर्स आगीच्या तांडवात