नांदेड(प्रतिनिधी)-ठाकरे सरकारने दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर छावा संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रमुख नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
आज दि.6 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे पत्रकार परिषदेत नानासाहेब जावळे पाटील बोलत होते. या पत्रकार परिषदेत विजयकुमार गाडगे पाटील, दशरथ कपाटे पाटील,पंजाबराव काळे पाटील, बालाजीदादा सुर्यवंशी, जंगले, माधवराव ताटे, बसवेश्र्वर जाधव यांची उपस्थिती होती.
अतिवृष्टीने मराठवाड्यात पोशींदा असलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. सर्व पिके वाहुन गेली आहेत, माती वाहुन गेली आहे तरी पण ठाकरे सरकार मदत करायला तयार नाही. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहिर करून 1 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर करावे. शेतकरी अडचणी असतांना सुध्दा विरोधी पक्ष नंदी बैलाची भुमिका बजावत आहे. सोबतच सरकार आणि विरोधी पक्ष दोघांच्या संगणमताने शेतकरी अडचण कोणीच समजून घ्यायला तयार नाही. दसऱ्यापर्यंत सरकारने शेकतकऱ्यांना मदत जाहिर केली नाही तर अखील भारतीय छाया संघटना रस्त्यावर उतरले आणि त्याची संपुर्ण जबाबदारी सरकारवर राहिल.
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील असे भाकित नानासाहेब जावळे पाटील यांनी व्यक्त केले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची वीज ऊर्जा विभागाने बंद करू नये असे आवाहन करत त्या ठिकाणी कांही वाईट परिणाम झाला तर त्याची जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्यांवर राहिल असे सांगितले आहे.
दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर छावा रस्त्यावर उतरणार-नानासाहेब जावळे पाटील