आज उद्या आणि परवा नांदेड जिल्हा यलो अलर्ट

नांदेड(प्रतिनिधी) – आज 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. हे पत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण कार्यालयाने निर्गमित केले असून या पत्रावर करीता लिहुनच स्वाक्षरी करण्यात आलेली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाने जारी केलेल्या एका पत्रानुसार दि.6 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तीन दिवसात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गढगडांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवीली आहे. नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे या पत्रात लिहिले आहे.
या पत्रावर पुन्हा एकदा शासनाच्या निर्देशांना ठेंगा दाखवून जिल्हाधिकारी करीता असे लिहुन त्यावर कोणी तरी सही केली आहे. मुळात शासनाच्या निर्देशानुसार करीता असे लिहुन पत्र निर्गमित करता येत नाही. करायचेच असेल तर त्यावर स्वाक्षरी करणाऱ्याने आपले पदनाम आणि नाव लिहिने आवश्यक आहे पण या पत्रावर फक्त करीता असेच लिहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *