नांदेड(प्रतिनिधी)-उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवात जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भाने पोलीस विभागाने मोठा फौजफाटा तयार ठेवला असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.
7 ऑक्टोबरपासून घटस्थापना नवरात्र उत्सव, माहुरच्या रेणुका देवीची यात्रा, रत्नेश्र्वरी येथील यात्रा या सर्व संदर्भात पोलीस विभागाने त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त राहावा आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तयार असल्याची माहिती दिली आहे.
पोलीस अधिक्षक-1, अपर पोलीस अधिक्षक -2, पोलीस उपअधिक्षक-11, पोलीस निरिक्षक-29, सहाय्यक पोलीस निरिक्षक /पोलीस उपनिरिक्षक-151, महिला व पुरूष पोलीस अंमलदार-1314, आरसीपी प्लॉटुन-5, एसआरपीएफ-1 कंपनी, पुरूष गृहरक्षक-900, महिला गृहरक्षक-200, नागपूर येथील पोलीस प्रशिक्षणार्थी-100, एवढे मनुष्यबळ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तयार असल्याचे सांगितले आहे.
नवरात्र उत्सवासाठी पोलीस फौजफाटा तयार