नांदेड,(प्रतिनिधी)- आज सकाळी प्रवासास निघालेल्या अमरावती – तिरुपती या जलद गाडीचे फक्त इंजिन पुढे पळाल्याचा प्रकार अकोला जवळ अमनवाडी येथे घडला.सुदैवाने कोणत्याच प्रकारचे नुकसान झाले नाही.काही वेळ प्रवाश्याची पाचावर धारण बसली होती,हाच थरार घडला,
आज सकाळी अमरावती-तिरुपती ही गाडी क्रमांक १२७६६ अमरावती येथून सकाळी ६.४५ वाजता आपल्या नियोजित प्रवासावर निघाली.८८.३ किलोमीटरचा अकोला पर्यंतचा प्रवास सुखरूप झाला.गाडीने अकोला स्थानक सोडले.पुढे २५ किलोमीटरवर अमनवाडी जवळ गाडीचे इंजिन कपलिंग तुटल्यामुळे एकटेच समोर पळाले.गाडीचे डब्बे विना इंजिनच्या धावू लागले.सर्व प्रथम हा प्रकार प्रवाश्याच्या लक्षात आला.सर्वच प्रवाश्यांची पाचावर धारण बसली.प्रत्येक जण परमेश्वराची आठवण करीत होता.अमनवाडी समोर उंची कडे जाणारी गाडी अखेर हळू हळू गती कमी होत थांबली आणि प्रवाश्याचा जीव भांड्यात पडला.गाडीचे इंजिन खूप पुढे निघून गेले होते.मग पुन्हा ते आले आणि तुटलेल्या कपलिंगला जोडले आणि पुन्हा तिरुपती प्रवास सुरु झाला.

गाडी पुन्हा एकदा प्रवासास लागल्या नंतर मात्र प्रवाशी आपल्या सोबत झालेली घटना इतरांना सांगून बापरे बाप म्हणत होते.आज सुदैवाने आपण वाचलो,कानाजवळून गोळी गेली अश्या भावना व्यक्त करीत होते.गाडीला जोडलेले कपलिंग प्रवासात अनेकदा तपासले जाते.तरीही हा तांत्रीक दुर्घटनेचा प्रकार आहे.असो गाडी क्रमांक १२७६६ अमरावती – तिरुपती मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना शुभकामना. ही गाडी नांदेड येथे १३.२५ वाजता पोहचते.