नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद पोलीस ठाण्याच्या रिकाम्या सिंहासनाची जबाबदारी पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या खांद्यावर पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याचा जुना अभ्यास त्यांना आपले कर्तव्य बजावण्यात मदतगार ठरेल.
नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेले पोलीस ठाणे धर्माबाद ही एक महत्वपूर्ण जबाबदारी मानली जाते. या आठवड्याच्या सुरूवातीला धर्माबादचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांची बदली झाली होती. त्यांना तेलंगणा राज्याच्या दुसर्या जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पोलीस ठाणे देगलूरची जबाबदारी देण्यात आली. आज धर्माबादच्या रिकाम्या सिंहासनाची जबाबदारी पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आज दि.८ ऑक्टोबरच्या सायंकाळी संजय हिबारे यांनी धर्माबाद पोलीस ठाण्याच्या पदभार स्विकारला आहे.
१९९३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेद्वारे पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त केलेल्या संजय हिबारे यांनी राज्यातील नागपूर, परभणी, नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद ग्रामीण, लातूर येथे आजपर्यंत आपले कर्तव्य निभावले आहे. सन २०१० मध्ये त्यांना पोलीस निरिक्षक पदी पदोन्नती मिळाली होती. पोलीस निरिक्षक पद मिळाल्यावर त्यांनी लातूर आणि परभणी जिल्ह्यात सेवा दिल्या आहेत आणि मागील महिन्यात ते नांदेड जिल्ह्यात बदलून आले होते. दरम्यान त्यांनी कांही पोलीस ठाण्यात प्रभारी कार्यभार चालविलेला आहे. पुर्वी सुध्दा ते नांदेडमध्ये होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा त्यांचा अभ्यास धर्माबादची जबाबदारी पार पाडतांना त्यांना मदतगार ठरणार आहे. त्यांच्या हितचिंतकांनी धर्माबाद पोलीस ठाण्यातील आपला कार्यकाळ त्यांनी उत्कृष्ट चालवावा अशा शुभकामना ज्ञापीत केल्या आहेत.