नांदेड(प्रतिनिधी)- नियमित अन्न सुरक्षा तसेच प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य विहित वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही म्हणून या योजनेला ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य स्वस्त धान्य दुकानात सप्टेंबर २०२१ चे नियमित अन्न सुरक्षा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्य विहित वेळेत पोहचवता आले नाही, त्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी या योजनेला धान्य वितरणासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी असे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोक जयंतराव एडके, राज्य सचिव शाहुराज गायकवाड, कार्याध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल मुनीर, उपाध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस अनिल पुरूषोत्तम कुलकर्णी, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर उकरंडे, शहर कोषाध्यक्ष जमील, मोहम्मद मुजाहेद, देविदास दगडे, अब्दुल नदीम, वैजनाथ सोनटक्के यांच्यासह अनेक पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.